महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान
च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
कानपुर येथील पोलिसांना तात्काळ बडतर्फ व देशद्रोहीचा गुन्हे दाखल करा
माजलगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान
च्या वतीने उपविभागी अधिकारी माजलगाव यांच्या कडे निवेदन
देण्यात आले आहे की कानपुर येथील ईद ए मिलाद च्या मिरवणुकीच्या दिवशी आय लव्ह मोहम्मद लिहिलेले फलक लावले म्हणून उत्तर प्रदेश च्या पोलिसांनी अनेक मुस्लिम तरुणांवर गुन्हे दाखल केल्याची बातमी बाहेर आल्यावर देश भरात कानपुर पोलीसांनी केलेल्या मनमानी कारभार विरुद्ध कारवाई करून पोलिसांना व अधिकारी यांना बडतर्फ करा हा प्रकार हुकूमशाही कडे जाणारा आहे.भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला आपापल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. जर सरकार संविधान विरोधी वागू लागले तर कठीण होईल सोशल मिडिया वर या विषयी माहीत झाल्यावर कानपुर पोलीसांनी यु टर्न घेत कारवाई ला दुसरे एंगल देऊन बचावाची भुमिका स्विकारली ,मुस्लिम बांधवांनी यापुढे आपसातले मतभेद संपवून भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारा नुसार मुख्य प्रवाहात यावे राहिला प्रश्न तर पैगंबर मोहम्मद साहेबांवर प्रेमाचा, तर ते जीव गेला तरी चालेल पण मात्र मरेपर्यंत प्रेम कायम राहील,
कानपुर पोलिसांची सखोल चौकशी करून तात्काळ बडतर्फ व त्याच्या वरती देशद्रोहीचा गुन्हे दाखल करा
व मुस्लिम समाजाच्या भावना दुखविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार वर प्रशासनांनी कडक भूमिका घेऊन एक नवीन कायदा लागू करण्यात यावे
तसेच कानपुर पोलिसांनी जे मुस्लिम समाजावरती जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते सर्वे खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे मुस्लिम समाजाला तात्काळ न्याय देण्यात यावा असे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान च्या वतीने उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे