या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सरपंच परमेश्वर गावडे दुर्गापुर यांची उपस्थिती. तसेच परिसरातील जनतेला मार्गदर्शन केले. या जनजागरण मेळावाच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या वतीने अनेक व्यक्तींना गरजू सामान वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपीचंद लोखंडे साहेब, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन पेंढरी; कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निंबाळकर साहेब, सीआरपीएफ कंपनीचे कमांडंट; प्रमुख मार्गदर्शक जाधव साहेब, उपनिरीक्षक पेंढरी; वाढवी साहेब, उपनिरीक्षक पेंढरी; तसेच परिसरातील सर्व गावांतील पोलीसपाटील, गावकरी, प्रतिष्ठित नागरिक, युवक, युवती आणि महिला उपस्थित होते.