पत्रकार परमेश्वर चांदणे
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 20 23 च्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे
फिर्यादी वडिलांच्या तक्रारीनुसार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजता त्यांचा 14 वर्षे पाच दिवस वयाचा अल्पवयीन मुलगा घरासमोरून अचानक बेपत्ता झाला आहे मुलगा घरात नातेवाईकाकडे किंवा ओळखीच्या ठिकाणी कुठेही न आढळल्याने कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणामध्ये राहत असलेल्या ठिकाणी जांभेगाव परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे तसेच कोलते पाटील . नरेगाव .संत तुकाराम कारखाना. तळेगाव दाभाडे सोमटना फाटा . देऊ रोड . मोकाइ चौक आकुर्डी . निगडी . भक्ती शक्ती . काळेवाडी पिंपरी चिंचवड डांगे चौक भूमकर चौक गायकवाड नगर पुनवळे तातोडे आळंदी. भोसरी पुणे रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता हा कुठेही आढळून आला नाही त्यामुळे वडिलांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने मुलाला ऊस लावून अथवा जबरदस्तीने पळवून नेल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे घटनेनंतर कुटुंबियांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन 23 जानेवारी 2026 रोजी रात्री आठ वाजता तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी fir क्रमांक 0046/2026 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून तपासाची जबाबदारी एपीआय आर आर पाटील मॅडम यांच्याकडे देण्यात आली आहे पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू असून विविध ठिकाणचे शिशी फुटेज मोबाईल लोकेशन तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली जात आहे
अल्पवयीन मुलाचा प्रश्न असल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून पोलीस प्रशासनाकडून तातडीने तपास गतिमान करण्यात आला आहे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे