शिवपुरी, प्रतिनिधी : महाशिवरात्री पर्वानिमित्त श्री क्षेत्र समिधा कोंडलिंगेश्वर देवस्थान मठ, शिवपुरी येथे सुरू असलेल्या रुद्रोपासना महोत्सवाला दुसऱ्या दिवशीही पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रुद्राभिषेक, पूजा-अर्चा व भगवान महादेवांचे दर्शन घेतले.
महोत्सवानिमित्त वेदमंत्रांच्या गजरात रुद्रपठण, महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसर फुलांची सजावट व रोषणाईने आकर्षक करण्यात आला असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
परिसरातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून महोत्सवात उत्साह व धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.