दारुड्या पतीची टॉवेलने गळा आवळून हत्या !
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये खळबळजनक घटना! दारुड्या पतीची टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याचा कथित आरोप बुलंदशहरमध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला अटक, घरगुती वादाला भयानक वळण!उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे ४५ वर्षीय कृष्ण कुमार यांचा घरात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रीती यांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, शवविच्छेदनात मृत्यूचे कारण गळा आवळणे समोर आले आहे आणि घरगुती वादादरम्यान टॉवेलने गळा दाबल्याचा आरोप आहे.तपासात कथित संबंध आणि संपत्तीवरून वाद झाल्याची बाबही समोर येत आहे. तर दुसरीकडे, आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती अनेकदा दारू पिऊन तिला मारहाण करत असे.सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून घटनेमागील खरे कारण समोर येणे अजून बाकी आहे. घटनेचा विडिओ ही सोसिअल मीडिया वर व्हायरलं झालेला दिसून येत आहे.
रिपोर्टींग ITN News
कृष्णा इंगोले
