आदिवासी सांस्कृतिक भवन तिरोडा येथे तिरोडा गोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची विस्तारीत नियोजन बैठक युवा नेते मा. रविकांत खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सदर बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युवा नेते रविकांत बोपचे म्हणाले की, ही निवडणूक क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची असून कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर ही निवडणूक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची आहे. पक्षाच्या उमेदवारी संदर्भात कोणत्याही संभ्रमाला बळी न पडता या मतदारसंघात आपल्या पक्षाचा कोटा असल्याने घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, मात्र आपल्यावर जबाबदारी मोठी असल्याने कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षात उत्तम समन्वय साधत सर्व शक्तीनिशी निवडणुकीत हिरहिरीने भाग घेत महाविकास (INDIA) आघाडीचे अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेत योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले.
*विविध पदांवर नियुक्त्यासह पक्ष प्रवेश*
सदर बैठकीत सौ. मेघा सुनील बिसेन यांची महाविकास आघाडीच्या विधानसभा राजकीय समन्वयक, डॉ. श्री महादेव पटले यांची डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष तर श्री प्रकाश करीहार यांची तिरोडा शहर सुदर्शन वाल्मिकी समाज प्रमुख पदावर निवड करण्यात आली असून नियुक्ती पत्र देत भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यासह सालेबर्डी येथिल श्री विशाल अटराहे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात युवा नेते रविकांत बोपचे यांनी पक्षाचा दुपट्टा घालून शुभेच्छा देत पक्षप्रवेश केला.
या बैठकीला श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्या सोबत सर्वश्री जिल्हा कार्याध्यक्ष राघवेंद्र(बाबा) बैस, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, तालुका अध्यक्ष हेमराज अंबुले, जिल्हा अध्यक्ष अनुसुचित जमाती सेल शामराव उईके, महिला जिल्हा उपाध्यक्ष चंदाताई शर्मा, महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री केलवतकर, शहर अध्यक्ष रवींद्र(पिंटू) वंजारी, कार्याध्यक्ष रजनीकांत शरणागत, तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय सेल युवराज शहारे, अनुसूचित जमाती सेल अध्यक्ष भोजराज उईके, महिला तालुका कार्याध्यक्ष छायाताई टेकाम, उपाध्यक्ष सकुनताई बोबडे, किसान आघाडी अध्यक्ष धानसिंग बघेले, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष इरफान पटेल, ओबीसी अध्यक्ष खेमराज पटले, महासचिव सोमेंद्र (मुन्ना) उपवंशी, सचिव आशिष येरपुडे, उपाध्यक्ष विजय बुध्दे, संघटक संजय धुर्वेआदिंसह जिल्हा परिषद तथा पंचायत समिती क्षेत्र प्रमुख, पक्षपदाधिकारी, बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण शेंडे
संवाददाता गोंदिया
मो. 9834486558