आमदार मंगेश चव्हाण यांना जगभरातील चाळीसगावकरांनी दिला पाठिंबा

सोशल मिडियातील आमदार मंगेश दादा यांच्या आवाहन उस्फूर्त प्रतिसाद

 

चाळीसगाव प्रतिनिधी:- बदलत्या चाळीसगाव चे साक्षीदार बनण्यासाठी आणि गेल्या पाच वर्षांत झालेला विकास आणि चाळीसगावचे पालटलेले रुप बघण्यासाठी राज्यातील, देशभरातीलच नव्हे तर जगभरातील चाळीसगावकरांनी मतदानाला उपस्थित राहून या बदलाचे साक्षीदार बनावे असे आवाहन भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी केले होते. आणि त्यांच्या या आवाहनाला जगभरातील चाळीसगावकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून कामानिमित्त वेगवेगळ्या देशांत राहत असलेल्या अनेक चाळीसगाव करांनी फोन, मेसेज, सोशल मीडिया वर अशा अनेक माध्यमांतून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकासाच्या व्हिजन ला पाठिंबा दिला आहे.

नुकतंच अमेरिका येथे राहत असलेल्या येवले दांपत्याने एक व्हिडिओ प्रसारित करुन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विकास रथाला सहकार्य करण्यासाठी व एक मत , एक दिवस मातृभुमिसाठी या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिकेतून मतदानासाठी चाळीसगाव येथे येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच देशातील विविध भागांमध्ये व राज्यातील विविध शहरांमध्ये व्यवसाय, शिक्षण, नोकरी निमित्त राहत असलेल्या शेकडो चाळीसगावकरांनी देखील सोशल मीडिया वर किंवा अनेक माध्यमांतून आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव येथे मतदानासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव मतदारसंघात सर्वदूर विकासकामांचा सपाटा लावला असून लवकरच चाळीसगाव हे विकासाचं रोल मॉडेल म्हणून नावलौकिक प्राप्त करेल म्हणून चाळीसगाव तालुक्याच्या बाहेर राहणार्या सर्व चाळीसगावकरांनी मतदानाला उपस्थित राहून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि यानिमित्ताने चाळीसगाव चे बदलले रुप देखील आपण सगळ्यांनी बघावं व पुढे देखील अशाच प्रकारे विकासकामं करण्यासाठी बळ द्यावं असं आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले होते.

Leave a Comment