महान संतांच्या मालिकेतील एक तेजस्वी तारा म्हणजेच संत जगनाडे महाराज होय
संत जगनाडे महाराज जयंती निमित्त कार्यक्रम उत्साहात
तिरोडा
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, यांच्यासारख्या महान संतांच्या मालिकेतील एक तेजस्वी तारा म्हणजेच संत संताजी जगनाडे महाराज होत. असे असे उद्गार प्रांतिक तेली समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा लोकमतचे तिरोडा तालुका प्रतिनिधी डी. आर .गिरीपुंजे यांनी व्यक्त केले.
तिरोडा शहरात संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते याप्रसंगी तेली समाजाचे तालुका अध्यक्ष एडवोकेट अशोक मलेवार, सचिव कमल कापसे ,मार्गदर्शक रामसागर धावडे, गोंदियाचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप समरीत, रवींद्रकुमार (पिंटू) वंजारी, विकी साखरवाडे ,निशांत कापसे, मनोज बावनकर, सचिन एरणे, अनुप थोटे, राजकुमार रुद्रकार, सचिन लांजेवार ,यांची उपस्थिती प्रामुख्याने होती .
याप्रसंगी कमल कापसे यांनी सांगितले की, संत जगनाडे महाराज यांच्या जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तहसील येथील चाकण गावी झाला. त्यांना वाचन आणि अंकगणित यांचे व्यवहारिक शिक्षण घरच्या घरीच मिळाले. वळणदार अक्षर व स्वच्छ लेखन करण्यात त्यांना प्राविण्य मिळाले होते त्यांची हे प्राविण्य आणि शिक्षण स्मरणशक्ती यामुळे त्यांनी तुकारामाची गाथा शब्दबद्ध करून मराठी साहित्याला अतिशय मोलाची देणगी दिली तसेच रामसागर धावडे यांनी समाजाची एकता व अखंडता ही समाजाच्या प्रगतीसाठी कशी पूरक ठरते हे हे विविध उदाहरणाद्वारे पटवून दिले तसेच एडवोकेट अशोक मलेवार यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे डी. आर .गिरीपुंजे यांच्यातर्फे वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन कमल कापसे प्रास्ताविक विकी साखरवडे तर आभार प्रदर्शन प्रदीप समरीत यांनी केले. यशस्वीतेसाठी तेली समाजातील बांधवांनी खूप मोलाचे सहकार्य केले.
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
मो. 9834486558
गोंदिया
महाराष्ट्र