
अशोक वार्डात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
तिरोडा
शहरातील अशोक वार्डात दरवर्षी प्रमाणे यंदाही तिरोडा नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोक असाटी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात व उत्साहाने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली . यावेळी तेली समाज गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष डी. आर. गिरीपुंजे ,तिरोडा तालुका सचिव कमल कापसे यांच्या हस्ते संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या छायाचित्राचे पुजन करून माल्यार्पन करून पुजा अर्चना करण्यात आली .त्यानंतर संताजी महाराजांचा जयघोष करुन महाराजांच्या बुद्धिमत्ता व गणितीय ज्ञान यामुळे त्यांनी आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला तसेच तुकारामाची गाथा पुन्हा लिहून काढली असे जिल्हा कार्याध्यक्ष डी आर गिरीपुंजे यांनी सांगितले तर जगनाडे महाराजांच्या जिवनपटावर कमल कापसे यांनी प्रकाश टाकून त्यांच्या समाजकार्याची महती सांगितली
यावेळी संजय सुपारे,अजय मलेवार,रोशन सातपुते, संदिप धोटे, कृष्णा कावळे, गजेंद्र मुरे, प्रशांत सहारे,पराग सहारे,कुणाल सहारे,भुषण देव्हारे,मनीष सहारे,प्रकाश कापसे,अजय बावने, नितेश धोटे, किशोर सहारे, नितेश सहारे,जितू सहारे इत्यादी समाज बांधवांना यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जितू सहारे आभार प्रदर्शन अजय बावणे यांनी केले यशस्वी यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
मो. 9734486558
गोंदिया महाराष्ट्र