गॅस कनेक्शन धारकांना रिफील पुरवठा वेळेवर करा.
तिरोडा शहर व तालुक्यातील घरेलु गॅस कनेक्शन धारक ग्राहकांना बुकिंग केल्या नंतर २४ तासाचे आत घरपोच पुरवठा करने अनिवार्य असतांना सुद्धा एजन्सी द्वारे वेळेवर पुरवठा करण्यात येत नाही, व विनाकारण ग्राहकांना त्रास देण्यात येते, हया बाबद अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा च्या वतीने तहसील कार्यालय तिरोडा इथे तहसिलदार साहेबांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करने व वरिष्ठ कार्यालयास सुचना देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा तालुका चे अध्यक्ष अब्दुल रफीक शेख, उपाध्यक्ष-सुशिल भातनकर, सचिव-महादेव घरजारे, संगठन मंत्री-वाल्मीक राऊत, कोषाध्यक्ष-अशोक रहांगडाले व इतर पदाधिकारी हजर होते.
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ गोंदिया
मो. 9834486558