तिरोडा – महाराष्ट्र राज्यात सरकार च्या आदेशा प्रमाणे कार्यालाइन दिवस सोमवार ते शुक्रवार आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टी असते सोमवार ते शुक्रवार , कार्यालइन वेळ सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 पर्यंत असून सुद्धा तिरोडा तहसील कार्यालयातील कर्मचारी आपल्या मर्जीने कार्यालयात येतात आणि जातात.बरेच से कर्मचारी अप- डाऊन करतात, कर्मचाऱ्याला मुख्यालयात राहण्याचे आदेश आहेत आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा तहसील कार्यालयातील कर्मचारी उपडाऊन करत असल्यामुळे सकाळी 11 वाजता कार्यालयात येतात आणि कार्यालईन वेळ संपन्यापूर्वीच निघून जातात.
तिरोडा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना, MREGS,हे विभाग गरीब लोकांसाठी आहेत.या विभागातील कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी खेडे गावातून बरेच से गरजू लोक येत असतात, त्यांच्या काही अडचणी असतात, पण विभागातील कर्मचारी कार्यालईन वेळ संपन्यापूर्वीच निघून जात असल्यामुळे गाव- खेड्यातून आलेल्या लोकांना उलट्या पायानी परत जावे लागते, तिरोडा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा हा बेजबाबदार पणा मुळे गरीब आणि गरजू लोकांची कामे वेळेवर होत नाही,अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.
याकळे तिरोडा तहसीलदार यांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे,
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ गोंदिया