हरिकृष्णा विद्यालय कोडेलोहारा येथे चोरी

तिरोडा तालुक्यातील ग्राम कोडेलोहारा येथील हरिकृष्णा विद्यालय कोडेलोहारा येथे दिनांक 17 डिसेंबर च्या मध्यरात्री दरम्यान चोरीची मोठी घटना घडली दिनांक 18 डिसेंबरला शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी शाळेच्या वेळेवर शाळेत पोहोचले असता चोरीची घटना उघडकीस आली

 

अज्ञात चोरट्यांनी शाळेतील मुख्याध्यापक कक्ष, वर्गखोल्या, संगणक कक्ष,सायन्स लॅब,शालेय पोषण आहार कक्ष या सगळ्या कक्षांचे ताले तोडून शालेय कागदपत्रे तसेच संगणक सीसीटीव्ही मशीन व इतर शालेय साहित्य तसेच शालेय पोषण आहार साहित्य यांची नासधूस व चोरी केल्याची मोठी घटना घडली आहे.

 

शालेय टि. सी. फाईल

टि.सी. बुक

विद्यार्थ्यांचे 12 वीचे Diploma

नागपुर बोर्ड फाईल

दाखल खारीज रजिष्टर

संगणक मॉनिटर-2 नग

K-Board-2 नग

2 प्रिंटर

शालेय पोषण आहार रेकॉर्ड

आवक जावक रजिष्टर

विज्ञान प्रयोगशाळेतील साहित्य

बॅंड साहित्य

मुख्याध्यापक कक्षातील CCTV कैमेरा मशिन

अटल लॅब चे मॉनिटर व माउस पोषण आहार तांदूळ – ३ बोरी

ऑईल सोयाबिन – 35 लिटर

जर्मन गंज-3 मोठे व वाटप साहित्य

विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व उपक्रम नोटबुक

चाब्यांच झोके (पूर्ण)

टिकास, फावडे या वस्तू चोरांनी चोरून नेल्या आहेत

 

तर आलमाऱ्यांचे नुकसान

इलेक्ट्रिक बोर्डांचे नुकसान दरवाजांचे नुकसान

स्टॅम्प तोडणे

बँड फोडणे

शालेय पोषण आहार साहित्यांची नासधूस

काही साहित्य शालेय विहिरीत फेकणे

अशाप्रकारे इतर साहित्यांची सुद्धा चोरट्यांनी क्रूरपणे नुकसान केले आहे.

 

या चोरीच्या घटने प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तिरोडा येथे अज्ञात चोरांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या चोरीच्या घटनेबाबतची माहिती बिहारी लाल रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली.

 

प्रवीण शेंडे

ब्युरो चीफ

गोंदिया

Leave a Comment