तिरोडा महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतिने नुकतेच नागपुर -गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्गची घोषणा करण्यात आली. यामध्ये मध्ये मौजा धादरी-उमरी येथील कास्तकारी शेतजमिन जाणारे सर्व पीड़ित शेतक-यानी विविध मागण्याचे निवेदन डाॅ दिनदयाल पटले याच्या नेतृत्वात उपविभागिय अधिकारी, तिरोडा यांना आज देण्यात आले.
नागपुर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृध्दी महामार्ग तयार होणार आहे आणि गट ग्राम पंचायत धादरी-उमरी येथे दि. १९/०६/२०२४ ला भूमिअधिग्रहण होना-या शेतजमिनिची यादी मिळाली व यादीची माहिती प्रकल्पग्रस्त शेतक-यांना कळले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मौजा धादरी-उमरी येथील शेतक-यांना भुमीहीन होण्याची पाळी येणार आहे तसेच या प्रमाणे तिरोडा तालुक्यातील अनेक गावातील शेतक-याची जमीन नागपुर ते गोंदिया समुध्दी महामार्ग मध्ये जात आहे.
पण समृध्दी महामार्गात शेतक-यांची जमीन जात असुन जात असलेल्या जमीनीबाबद शेतक-यांना कोणत्याची प्रकारची वैयक्तीक नोटीस मिळालेली नाही आणि या अगोदर सर्व शेतक-यांनी दि.२७/०३/२०२४ ला शेतकरी मागण्यांचा पहिला अर्ज आणि दि.२१/०६/२०२४ ला दुसरा अर्ज दिलेला होता पण अजूनपर्यंत त्या अर्जावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आणि शेतक-यांच्या जमीनीची भूमिअधिग्रहण करावयाचे असल्यास पिडीत प्रकल्पग्रस्त शेतक-यांना विश्वासात घेवुन जमीनीचे अधिग्रहण करण्यात यावे अशी मागणी सर्व शेतक-यांच्या वतिन करण्यात आली आहे.
तसेच मौजा-धादरी/उमरी येथील पिडीत प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या खालील मागण्या असुन त्या पूर्ण करण्यात यावे. निवेदनात खालिल प्रमाने विविध मागन्या करन्यात आल्या.
1. शेतजमिन अधिग्रहन करतांनी सगळ्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना विश्वासात घेउन आजच्या नविन खरेदी किंमतीच्या पाच पट रक्कम देण्यात यावी.
2. नागपुर गोंदिया समृध्दी महामार्ग लगत शेतक-यांच्या उरलेल्या जमीनीकरीता शेती करण्याकरीता दुतर्फा वहिवाटी रस्ता (सर्विस रोड) करून देण्यात यावे.
3. प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतक-याला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे.
4. प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतक-याच्या कुटुंबातील एका सदस्याला शिक्षण योग्यतेनुसार शासकीय नौकरीमध्ये समावेश करण्यात यावे.
5. नागपुर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृध्दी महामार्गात जे प्रकल्पग्रस्त शेतकरी भुमीहीन होत आहेत त्यांना शेती करण्याकरीता शेती योग्य शासकीय जमिन उपलब्ध करून देण्यात यावी.
वरील सर्व मागण्यांचा विचारपूर्वक निर्वाहन करण्यात यावे अशी मागणी सर्व शेतक-यांच्या वतिन करण्यात आली.
यावेळी डॉ.दिनदयालजी पटले, सुखदासजी अनकर, सुनील पटले, इंजि. कुमुद पटले, मोरेश्वर अनकर, शरद भौत्तिक, अनिल अनकर, दिनदयालजी अनकर, गणेश पटले, सतीश पटले, महेंद्र कुत्राहे, घनश्याम रहांगडाले, पामराज कुत्राहे, शंकर कुत्राहे, प्रभूलाल कुत्राहे सह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. वरील मागण्या शासनाने पुर्ण करावे अन्यथा सर्व प्रकल्पग्रस्त शेतक-यांकडुन भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे.
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
गोंदिया