तिरोडा/ दि. 7/2/2025 ला तिरोडा विधानसभा अंतर्गत येणार्या ग्राम लाखेगांव येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या मुर्ती अनावरण सोहळ्या निमीत्त सायंकाळी आदीवासी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी उपस्थीत जिल्हा परिषद सदस्य जगदीशजी बावनथडे यांच्या समक्ष लाखेगावचे सरपंच व समस्त आदीवासी बांधवांनी अनेक मागण्या करत आदीवासी बांधवांच्या विकासासाठी आपण तातडीने प्रयत्न करावे व जिल्हा परिषदे मधे आमच्या समस्या मांडुन न्याय द्यावा,
ह्या सर्व मागण्या व समस्या ऐकुन जिल्हा परिषद सदस्य जगदीशजी बावनथडे यांनी समाज बांधव आणी गावकरी लोकांना आश्वासन दिले कि लवकरच तुमच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील,
आणी मी तुमच्या साठी 24 तास उपलब्ध आहे कधीही गरज पडली तर मला भेटा मी तुमचे प्रश्न सोडवायला तय्यार आहे असे प्रतिपादन करत आपले अध्यक्षिय भाषन पुर्ण केले,
जिल्हा परिषद सदस्य जगदीशजी बावनथडे यांच्या सह उपस्थितांमधे- जे.पी.पटले पंसं सदस्य, भाष्करजी जुनेवार सरपंच, दुर्गेशजी कडपती, शामरावजी उईके, मुन्नाजी बिंझाडे, टेकलालजी सोनेवाने, देवेंद्रजी चौधरी, व इतर मान्यवर उपस्थित होते
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
गोंदिया