महावन हक्क धारक आदिवासी शेतकऱ्यांची डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडे मागणी*
गडचिरोली येथील जनता तक्रार दरबारात कैफियत सांगून मागितला न्याय
*जनता दरबाराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद*
*दिनांक 17 फेब्रुवारी गडचिरोली*
*पयडी येथील 11 वन धारकांचे दावे आयुक्त नागपूर यांनी जमिनींचे सर्वे नंबर चुकीचे आहेत असे सांगून फेटाळले तसेच तहसीलदार धानोरा व उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांचेकडे पयडीच्या शेतकऱ्यांचे अनेक वन हक्काचे दावे मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना वन हक्काचे दावे मिळवून द्यावे व न्याय द्यावा अशी मागणी पयडी येथील अन्यायग्रस्त वन हक्क धारक शेतकऱ्यांनी डॉक्टर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडे निवेदनाच्या माध्यमातून केली.*
*डॉक्टर देवराव जी होळी यांचा गडचिरोली येथे दर सोमवारला भरणारा जनता तक्रार दरबार असतो या दरबारात येऊन या शेतकऱ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे समोर मांडली. यावेळी डॉक्टर देवरावजी होळी यांनी तातडीने फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तहसीलदार धानोरा,उपविभागीय अधिकारी गडचिरोली व जिल्हाधिकारी यांना पत्र तयार करून घेतले. व त्यातून तातडीने या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.रिपोर्टर *अभिजीत गाईन