इंडियन टीवी न्यूज से ब्युरो चीफ प्रताप नागरे वाशिम जिल्हा
वरली मटका जुगार खेळणाऱ्या इसमावर धडक कारवाईत एकूण दोन लाख दहा हजार 900 रुपयाचा मुद्देमाल जप्त
दिनांक चार तीन 2025 रोजी गुप्त माहितीदाराकडून उपग्रह पोलीस अधिकारी वाशिम यांना खात्रीलायक माहिती मिळाली की मालेगाव येथील जुन्या बस स्टँड जवळ आनंद वाईन बार च्या पाठीमागे मोकळ्या जागेत काहीसं वरली मटक्याचा जुगार खेळत आहेत अशा प्राप्त माहितीवरून श्री नवदीप अग्रवाल भा.पो.से. यांनी त्यांचे पथकासह बस स्टॅन्ड येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी मिलन तसेच कल्याण नावाचे जुगारावर लोक पैशाचे हार जितने जुगार खेळताना मिळून आले. आरोपीकडून 1 नगदी 19 हजार 720 रुपये वरली मटक्याच्या हिशोबाचे रजिस्टर बॉलपेन किंमत दहा रुपये. कॅल्क्युलेटर किंमत शंभर रुपये
2 मो.सा. किंमत एक लाख 40 हजार रुपये, 06 मोबाईल किंमत 51 हजार रुपये असा एकूण दोन लाख दहा हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर अवैध वरली मटक्याचा जुगार चालवणारे व जुगार खेळणारे एकूण 11 आरोपीवर
पोस्र्टे मालेगाव येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
आरोपी 1 रमेश शिवलाल राठोड,2 अनिल सुदाम कांबळे, 3 गोपाल सूर्यभान खुळे, 4 विलास नारायण कुटे, 5
गणपत गोविंदा धोंगडे, 6 विजय गोपाल बोरकर, 7 बाळू भगवान सावळे, 8 प्रवीण मधुकर कानेड, 9 महादेव किसन सरकटे, 10 अशोक ओमकार वानखेडे, 11 नंदू तुळशीराम खडसे, सदर कारवाई मा पोलीस अध्यक्ष श्री अनुज तारे ,मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री नवदीप अग्रवाल. पोहेकाँ. अरविंद राठोड, पोहेकाँ हरिभाऊ कलापाड. पोकाँ स्वप्निल शेळके, पोकाँ शंकर वाघमारे. चापोकाँ गणेश बाजे यांनी केली.