जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्काराला श्री. छत्रपती संभाजी महाराज हे नाव द्या

इंडियन टीवी न्यूज से.प्रताप नागरे ब्युरो चीफ वाशिम

सागर गुल्हाने यांची मुख्यमंञ्याकडे मागणी

वाशिम:-दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 01 मे किंवा 26 जानेवारी या दिनानिमित्त जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्कार देण्यात येतो जिल्हयातील उत्कृष्ठ क्रीडापटूना तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांना त्यांच्या क्रीडा कार्याचे योगदानाचे मुल्यमापन करून त्यांच्या गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणाअंतर्गत जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत आहे परंतु यापुढे या गुणवंत क्रीडा पुरस्काराला श्री छत्रपती संभाजी महाराज हे नाव देऊन गौरवण्यात यावे जेणेकरून महाराष्ट्रातील कर्तुत्वाने बलाढ्य आणि क्रीडा क्षेत्रात निपुण असलेले उत्कृष्ट योद्धा अशा छत्रपती संभाजी महाराजांची खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि महाराजांच्या जीवनातील संघर्ष हे खेळाडूंना प्रोत्साहन आणि ऊर्जा देत राहील. तसेच राज्यातील सर्वात उत्कृष्ट राज्य क्रीडा पुरस्कार म्हणून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यात येतो त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील गुणवंत क्रीडा पुरस्कार हे छत्रपती संभाजीराजे पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात यावा अशी मागणी शीवछञपती क्रिडा पुरस्कारप्राप्त महाराष्टराज्य सागर गुल्हाने यांनी मुख्यमंञी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

Leave a Comment

05:55