दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्याचे कळताच आग विझविण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना आग विझविताना घरात मोठया प्रमाणात
रोख रक्कम सापडल्याने न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाला.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील काॅलेजियमने न्या.वर्मा यांची तात्काळ अलाहाबादला बदली करण्यात आली.या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले.
**माञ अग्निशमन दलाने कोणतीही रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
सरन्यायाधीश खन्ना साहेब यांनी न्या.वर्मा यांची अलाहाबादला बदली
केली असली तरी काॅलेजियमचे सदस्य एवढया कारवाईवर खुष नसुन या प्रकरणी न्या वर्मा साहेब
यांचा राजीनामा मागितला जावा असे काही सदस्यांचे मत व्यक्त करण्यात आले.या प्रकरणाचे राज्यसभेत विरोधकांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला.
//चुकिची माहिती आणि अफवा//
सर्वोच्च न्यायालयाने एका निवेदनात म्हटले कि “न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी
घडलेल्या घटनेबाबत चुकिची माहिती पसरवली जात आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डि. के.उपाध्याय यांनी
चौकशी करून अहवाल सरन्यायाधीश संजीव खन्ना साहेब यांना सादर करणार आहेत.
सातारा सुहास पाटील कराड
