दूध 54 रु.तर म्हैशीचे दुध 74 रु.प्रतिलिटर
राज्यात दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात येत असून गाय व म्हैस दुध दरात प्रति लिटरला 2 रु.वाढ करण्यात येणार आहे.ही दर वाढ शनिवार दिनांक.15 मार्चपासून करण्यात येणार असल्याची माहिती दुध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ राव म्हस्के व मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.
काञज दुध संघाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीस राज्यातील सहकारी व खाजगी डेअरीचे एकुण 47 प्रतिनिधी हजर होते.त्यावेळेस काञज दुध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांनी राज्य सरकारच्या दुध अनुदान योजनेत मागील तीन महिन्यांचे लि.5 रु.अनुदान मिळाले नाहीत. ते अनुदान लवकर शेतकऱ्यांना मिळावे अशी बैठकित मागणी करण्यात आली.
त्या बैठकित भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
