G-2P164PXPE3

क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची कारवाई: पाच आरोपी अटकेत, ४.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

इडीयन टिवी न्यूज प्रताप नागरे

अकोट : शहरातील गुरुकुंज कॉलनीत.आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १६ मोबाईल, ३ लॅपटॉपसह एकूण ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अकोट शहर पोलिसांनी ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास केली.
पवन विजय नागापुरे (रा. वडाळा, जि. अमरावती), आयुष विनोद वाटाणे (रा. आसेगाव, जि. अमरावती), चेतन हरीभाऊ ढोणे (रा. कुन्हा, ता. तिवसा, जि.
अमरावती), प्रज्वल विनायक कुडवे (रा. वाडी, नागपूर) आणि स्वप्निल संजय कुथे (रा. बोरगाव, जि. वर्धा) हे आरोपी दिल्ली विरुद्ध हैदराबाद या आयपीएल सामन्यावर ग्राहकांचे आयडी तयार करून बेटिंग घेत होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सहायक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल माळवे, उपनिरीक्षक निलेश बारहाते व डीबी पथकाचे प्रमुख वैभव तायडे, नरेंद्र जाधव, गणेश सोळंके, बजरंग इंगळे, गजानन राठोड, विपूल सोळंके, कपिल राठोड आदींनी केली.
घरफोडीच्या तपासात क्रिकेट सट्टा पकडला!
गुरुकुंज कॉलनीतील घरफोडी प्रकरणाचा तपास करताना क्रिकेट सट्टा पकडण्यात आला. या घरफोडी प्रकरणाचा पोलिस तपास करीत होते. शहर पोलिसांना या घरात अनोळखी इसम गत अनेक दिवसांपासून राहत असल्याची माहिती मिळाली होती.या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सोमवारी सापळा रचून धाड टाकली. घराची झडती घेतली असता तेथे आरोपी आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असल्याचे आढळून आले.

Leave a Comment