जिल्हा परिषद भारतीय विद्यालय एकोडी येथील विद्यार्थिनी कुमारी अनम रहमान शेख हिला इयत्ता दहावी मध्ये सत्र 2024/25 मध्ये मराठी विषयात एकूण100 पैकी 90 गुण प्राप्त झाले त्याबद्दल महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ संलग्न गोंदिया विभागाच्या वतीने आज दिनांक 12 /8 /2025 ला जिल्हा परिषद गोंदिया येथे जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री लायक रामजी भेंडारकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुंगानंथम , तसेच मा.श्री . सुरेशजी हर्षे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती जिल्हा परिषद गोंदिया,यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन मराठी भाषा शिक्षिका सौ श्रुती नरेंद्र पाळेकर यांच्यासह सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी कु.अनम रहेमान शेखचे पालकही उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा रिपोर्टर
महेंद्र कनोजे
7798817224