नांदेड : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागातून नांदेड ते नागपूरदरम्यान विशेष गाडचा चालविण्यात येणार आहेत.
नांदेड ते नागपूर (गाडी संख्या ०७०८५) ही विशेष गाडी १ ऑक्टोबर रोजी रात्री ८.२० वाजता सुटेल ही गाडी मुदखेड, हिमायतनगर, किनवट,
आदिलाबाद, पिंपळकुट्टी मार्गे चावेल आणि नागपूर येथे दुसर्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता पोहोचेल. तर २ ऑक्टोबर रोजी नागपूर ते नांदेड ही विशेष गाडी नागपूरहून रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता नांदेडला पोहोचेल.
नांदेड-नागपूर-नांदेड ही दुसरी विशेष गाडी पूर्णा हिंगोली-वाशीम
अकोला धावेल सदर गाडी १ ऑक्टोबर रोजी नांदेड येथून रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. तर ही गाड़ी नागपूर येथून ३ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता सुटेल त्याच दिवशी सकाळी ११ वाजता नांदेडला पोहोचेल.