शहराच्या विकासासाठी सौ.शिफा बिलाल चाऊस यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी- मोहन जगताप.
टक्केवारी खाणाऱ्या आमदाराला हद्दपार करणार-बाबुराव पोटभरे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या
उमेदवाऱ्या पत्रकार परिषदेत केल्या जाहीर.
माजलगाव (प्रतिनिधी) दि.१९ : माजलगाव शहराच्या विकासासाठी समृद्धीसाठी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी सौ.शिफा बिलाल चाऊस यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. चाऊस यांच्या माध्यमातून आम्ही शहराचा विकास करणार असल्याचे मोहन जगताप म्हणाले.
तर विकास कामात टक्केवारी खाऊन भ्रष्टाचार करणाऱ्या आ. प्रकाश सोळंके यांना नगर परिषदेच्या निवडणुकीतून हद्दपार करणार असल्याचे बाबुराव पोटभरे यांनी सांगितले.
मोहन जगताप यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार बुधवार दि.19 रोजी जाहीर करण्यात आले.
यावेळी ते पत्रकारांना बोलताना म्हणाले की, शहरात नागरी समस्या प्रलंबित आहेत. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.अशा स्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट निवडणुकीच्या मैदानात उतरला असून शहराच्या विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. असं सुतोवाचन पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी केले. दरम्यान नाट्यगृह, आठवडी बाजार, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
तर बहुजन विकास मोर्चा मोहन जगताप सहाल चाऊस यांना सोबत घेऊन आ.प्रकाश सोळंके यांना नगरपरिषद निवडणुकीत हद्दपार करणार आहे. ही लढत टक्केवारी खाऊन गलेलठ्ठ होणाऱ्या आमदार सोळंकेला धडा शिकवणारी असेल
असे बहुजन नेते बाबुराव पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला माजलगाव विधानसभा अध्यक्ष नारायण डक, कचरू खळगे,श्रीहरी मोरे, विश्वंभर थावरे, सहाल चाऊस, श्रीकृष्ण सोळंके, शकील कुरेशी, प्रभाकर नरवडे, विवेक पोटभरे, शरद यादव, इत्यादी उपस्थित होते. यावेळी प्रभाग क्रमांक 1 मध्ये दळवी जया,शरद यादव प्रभाग 2 जावळे उज्वला, तालेब चाऊस, प्रभाग 3 सय्यद आली नूर, शेख नाजमीन, प्रभाग 4 मेंडके किशोर, मेंडके कांताबाई, प्रभाग 5 सुचिता होके, चंद्रकांत देशमुख, प्रभाग 6 गंगाबाई भोसले, लतीफ सय्यद हुर, प्रभाग 7 शिंदे संध्या, शंकर शेंडगे, प्रभाग 8 सहाल चाऊस, शेख नूरजहाँ प्रभाग 9 महेमुद कुरेशी,
सीमा होके, प्रभाग 10 नीला इतापे, इम्रान खान, प्रभाग 11 सुलताना कुरेशी, अजिंक्य डक, प्रभाग 12 लता वाघमारे, सय्यद तौफिक, प्रभाग 13 उषा अशोक लांडगे, सय्यद अफसाना सलीम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.माजलगांव जय भीम नगर व बिलाल मोहल्ला या ठिकाणी आज प्रथम माजलगाव नगराध्यक्ष पदाचे मेहरूनबी पटेल .उषाताई बनसोडे. सय्यद रफीक. यांच्या प्रचारार्थ आमदार प्रकाश दादा सोळंके व अच्युत लाटे. जयदत्त नरवडे. नासिर खान पठाण पात्रुडचे मनसबदार इत्यादी मान्यवरच्या उपस्थितीमध्येकॉर्नर बैठक संपन्न झाली