हुडकाटोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हुडकाटोला येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यात आले .विद्यार्थ्यांचा उत्साह, आत्मविश्वास व सांस्कृतिक सादरीकरण पाहण्याचा आनंद मिळाला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारयुक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन व पालकांनी घेतलेले परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली गुणवत्ता अशा व्यासपीठांमुळे समोर येते. शिक्षण व संस्कार हीच सक्षम समाजनिर्मितीची खरी पायाभरणी असून अशा उपक्रमांना सदैव राबविणे गरजेचे आहे या कार्यक्रमा दरम्यान,
कार्यक्रमाच्या उद्घाटन म्हणुन मा चतुर्भुज जी बिसेन सदस्य जिल्हा परिषद गोंदिया आणि अध्यक्ष म्हणून मा, डॉ चेतलाल जी भगत सदस्य पंचायत समिती गोंदिया कार्यक्रम चे दिप प्रज्वलक म्हणून सुनील जी नागदेवे सरपंच ग्रामपंचायत बोदा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, राजेश जी शहारे उपाध्यक्ष ललीता ताई बाळणे व मुख्याध्यापक संजय बावनकर सर व सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर लाहन लाहन विद्यार्थ्यांनी कला नृत्य, सादर केले एकपात्री अभिनय, एकांकिका, वेशभूषा सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक यांनी सहकार्य केले आणि ह्या कार्यक्रमात शाळा समिती अध्यक्ष कार्यक्रम चालू करण्यात आला यांच्या कडून विद्यार्थ्यांना बक्षीस शा,व्य, समिती यांच्या कडून विद्यार्थ्यांना स्नेहभोजन यांच्या कडून देण्यात आला
गोंदिया जिल्हा रिपोर्टर महेंद्र कनोजे