इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम मध्ये फळवाटप…
अनुकंपा धारक संघाच्या वतीने वाटले फळ.
वाशिम: राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाशीमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. अनुकंपा धारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर यांच्या वतीने हा फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील अनुकंपा धारकांना नोकरीत लागण्यासाठी सतत शासन दरबारी पाठपुरावा करून हजारो अनुकंपा धारकांना नोकरीत लावणारे अनुकंपा धारक संघाचे मार्गदर्शक तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अनुकंपा धारक संघाच्या वतीने सुद्धा जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांना फळवाटप केल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
फळ वाटप करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, अनुकंपा धारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर, पत्रकार विठ्ठल देशमुख, किशोर गोमाशे, गजानन देशमुख, मनोज जयस्वाल, संजय काळे, नारायण आरु, डॉ. पुरुषोत्तम जाधव, राहुल निर्बाण, पवन गाडेकर, गणेश मोहळे, मनोज जयस्वाल, साजन धाबे, यांच्यासह अनुकंपा धारक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.