अतिवृष्टीग्रस्त भागात स. दर्शनसिंग सिद्धू यांच्याकडून खिचडी वाटप
(प्रतिनिधी) विठ्ठल कदम शिवपुरीकर.येथील सामाजिक राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या शिवसेना सहसंपर्कप्रमुख स. दर्शनसिंग महाराज यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दोन दिवसांपासून नांदेड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांना त्यांनी खिचडीचे वाटप केले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नांदेड शहरात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील गोविंदनगर, शिवनगर, कर्मवीरनगर, विठ्ठलनगर, माता गुजरीजी चौक, महाराणा प्रताप सोसायटी, बायपास रोड अशा अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी घरात शिरल्याने असंख्य नागरिकांच्या घरांतील
अन्नधान्याची नासाडी झाली होती. यामुळे अनेकांना खाण्यासाठीही अन्न उरले नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक राजकारणाचा वसा जपत ना. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव
बोंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संपर्कप्रमुख दर्शनसिंग सिद्धू महाराजांनी या भागात खिचडीचे वाटप केले. असंख्य नागरिकांची भूक भागविण्यासाठी त्यांनी घेतलेला फार कौतुकास पात्र ठरला आहे. यावेळी श्याम वानखेडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.