. १९ सप्टेंबर २०२५, गडचिरोली :
देशाचे लोकप्रिय, विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा – सेवा, सुशासन व गरीब कल्याण उपक्रमांतर्गत आज गडचिरोली येथे भाजपाचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा व बैठक पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी भूषविले.
बैठकीदरम्यान सुरुवातीस सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. त्यानंतर बावनकुळे साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यानंतर त्यांनी आगामी निवडणुका, संघटनात्मक बांधणी व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यकर्ता संवाद बैठक मेळाव्यात मान.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले आपले सरकार हे गतिमान,पारदर्शक, लोकाभिमुख काम करणारे सरकार आहे यासोबतच भाजपा संघटनेवर अधिक भर देत *संघटनात्मक मजबुती* प्रत्येक बुथ मजबूत झाला तरच भाजपला मोठे यश मिळेल.*विकासकामांवर भर* केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी.*युवा व महिलांचा सहभाग* : संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक. *आगामी निवडणुका”* : कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून मतदारांशी थेट संवाद साधावा.
या संघटनात्मक मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला.
*_काँग्रेस मधील अनेक नेत्यांचा भाजप मध्ये प्रवेश_*
देशाचे लोकप्रिय, विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच राज्याचे लोकनेते, लोकप्रिय मुख्यमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकर्तुत्वावर व विकासाभिमुख कार्यावर तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांवर विश्वास ठेवून,या भव्य कार्यकर्ता संवाद मेळाव्यात काँग्रेस पक्षातील अनेक मान्यवर नेत्यांनी भाजपाच्या लोकाभिमुख, विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्वास ठेवून मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात व माजी खासदार, राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसूचित जाती-जनजाती मोर्चा मा. डॉ. अशोकजी नेते यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षाचा दुपट्टा देऊन नव्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक प्रवेश देण्यात आला.
या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,
आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र डॉ. मिलिंदजी नरोटे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,माजी आमदार कृष्णाजी गजबे,माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,माजी जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे,महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस, भाजपा कि.मो. प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,गोविंदजी सारडा, सदानंद कुथे, गीता हिंगे,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा योगिताताई पिपरे, आदिवासी मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष डॉ. नितिन कोडवते, भाजप नेत्या डाँ. संगिता राऊत (रेवतकर) डॉ. चंदाताई कोडवते, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष विलास पाटील भांडेकर,प्रमोदजी पिपरे (लोकसभा समन्वयक), ओबिसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष भास्कर बुरे, मधुकरजी भांडेकर (युवा मोर्चा अध्यक्ष) अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष बबलू भाई हुसेनी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
या कार्यकर्ता संवाद मेळाव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वास संचारला असून, आगामी निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्जतेचा संकल्प व्यक्त केला आहे.