महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ व कृषी विज्ञान केंद्र तडसर व पशुधनव्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय साखराळे ईश्वरपुर यांच्या संयुक्त विधमाने प्रधानमंञी किसान सन्मान निधी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आज दिनांक 19/11/25 रोजी साखराळे ईश्वरपुर येथे पशुधनव्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय येथे किसान निधी वाटपाचा कार्यक्रम थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.हया कार्यक्रमासाठी साखराळे ईश्वरपुर परिसरातील शेतकरीवर्ग विद्यालयातील विदयाथीॅ व महिला उपस्थित होते. ह्या कार्यक्रमांसाठी शेतकऱ्यांना व विदयार्थाना मार्गदर्शन करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील डाॅ.विश्वाभर पाटोदाकर, डाॅ.अजय खानविलकर, यांनी कृषी विज्ञान केंद्र तडसरचे वरिष्ठ संशोधन शास्ञज्ञ डाॅ.अविनाश कदम,डाॅ.साईनाथ भोकरे व श्री.अनिकेत शिंदे हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कांबळे सर यांनी केले. या कार्यक्रमात शिरवळ विद्यालयाचे डाॅ.पाटोदाकर यांनी बदलत्या हवामानाचा पशुधनावर होणारा परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. डाॅ.अजय खानविलकर यांनी पशु व्यवस्थापन या विषयावर व डाॅ.अविनाश कदम यांनी ऊनाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन कसे करावे हे कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमांसाठी साखराळे ईश्वरपुर विद्यालयाचे संस्थापक श्री.बाळासाहेब पाटील (दादा) श्री.बी.डी.पवार साहेब,साखराळे विद्यालयाचे प्राचार्य डाॅ.नष्टे,जे.बी.पाटील,डाॅ.सुहास पाटील,सत्यजित पाटील सर,कांबळे सर,कांबळे मॅडम व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन साखराळे पशु.दुग्धोत्पादन विद्यालय व कृषी विज्ञान केंद्र तडसर यांनी केले.
सातारा जिल्हा रिपोर्टर सुहास पाटील