पुणे येथील सत्यशोधक बहुजन आघाडी, जोतिबा सावित्री फाऊंडेशन आणि आंबेडकरवादी मातंग परिषद यांच्या वतीने केला जाणार बहुमान..!!
माजलगाव ( प्रतिनिधी ) : मातंग समाजाला आंबेडकर चळवळीची जाणीव करून देणारा संघर्ष योद्धा अमोल शेरकर यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वैचारिक वारसदार पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.
सत्यशोधक बहुजन आघाडी व ज्योतिबा सावित्री फाउंडेशन यांच्या विद्यमानातून आंबेडकरवादी मातंग परिषद यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा पुणे येथे आयोजित केला आहे.
या सोहळ्याचे आयोजन दि. 25 जानेवारी रोजी ठीक 12.वाजता साने गुरुजी स्मारक राष्ट्रसेवा दल पुणे या ठिकाणी होणार आहे.
अमोल शेरकर यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला आणि चळवळीला साजेसे योगदान दिले. समाजाला आंबेडकरी प्रवाहामध्ये आणण्यासाठी अमोल सरकर यांनी गेल्या 13 वर्षापासून विविध कार्यक्रमाद्वारे नेहमीच प्रयत्न केले आहेत. महापुरुषाच्या जयंतीनिमित्त विविध व्याख्यानमाला व विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. तसेच समाजाच्या विविध सामाजिक राजकीय प्रश्नावर आग्रही भूमिका घेऊन समाजाला न्याय मिळवून देण्यास सतत अग्रेसर असणार नेतृत्व आहे अशी प्रतिमा तयार झाल्याने या कामाची पावती म्हणून हा बहुमान पुणे या सारख्या ठिकाणच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आंबेडकरवादी मातंग परिषद यांनी आयोजित केला आहे.
या पुरस्कार सोहळ्यास राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तरी या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक यांनी केले आहे.