ITN National

इंडियन टीवी न्यूज

Advertisement

बस आणि कारच्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू

```

परमेश्वर चांदणे 

मराठवाडा चिप ब्युरो 

माजलगाव तालुक्यातील तेलगाव रस्त्यावर भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे या भीषण अपघात एवढा मोठा होता की त्या कारमधील एकही जण वाचू शकला नाही बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने त्या परिसरातील मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या दुर्दैवी घटनेमध्ये ओमकार महादेव गिरी वय वर्ष 24 गजानन महादेव नामदास वय वर्ष 38 समर्थ गजानन नामदास वय तेरा वर्षे ऋतिक मोतीलाल बडे वय वर्ष 23 अनिल आचार्य वय वर्षे चाळीस हे सर्व राहणार माजलगाव परिसरातील असल्याने सर्व माजलगाव शहरातील व परिसरात शेकडा पसरली आहे

हे सर्व कार मध्ये माजलगाव येथून तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी जात होते त्या प्रवासादरम्यान अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर पातुर आणि शिंदेवाडी फाटा या ठिकाणी आले असता अचानक कार आणि तेलगावहून माजलगाव कडे येणारी एसटी महामंडळाची बस क्रमांक एम हेच 20 एल 27 40 या गाडीची समोरासमोर धडक झाली यामुळे हा भीषण अपघात घडला आहे हा अपघात इतका भीषण होता की एसटी खाली कार अडकून पूर्णपणे चक्काचूर झाली होती या मध्ये जे पाच प्रवासी बसले होते ते जागीच ठार झाले आहेत अपघात घडतात घटनास्थळी उपस्थित प्रवासी आणि हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत मदत केली मात्र कार पूर्णपणे एसटी खाली दबल्याने मदत करण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती जेव्हा प्रवाशांना बाहेर काढले तेव्हा मात्र ते मयतच निघाले यानंतर या घटनेची पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मृतदेह स्वविच्छेदनासाठी माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र एकाच वेळी पाच जणांचा बळी गेल्याने माजलगाव तालुक्यावर शक काळा पसरली आहे तसेच या घटनेने माजलगावातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हळूहळू व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *