ठाकरे जनतेशी संवाद साधून त्यांच्या मनातील उमेदवार देणार का?

ठाकरे जनतेशी संवाद साधून त्यांच्या मनातील उमेदवार देणार का?

आघाडीसह स्व:पक्षातिल मतदारांना उमेदवार बदलाची अपेक्षा

 

बुलढाणा/पुरुषोत्तम बोर्डे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मातृतीर्थ सिंदखेडराजा व मेहकर विधानसभा मतदार संघात आज दि.२० मार्च रोजी जनतेशी संवाद साधण्यासाठी येत आहे, तर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून जिल्हयात प्रा नरेंद्र खेडेकर यांनी आपला प्रचार सुरु केला आहे. परंतू खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरुध्द लढण्यासाठी ते सक्षम नसल्याचे कार्यकर्त्याची ओरड होत आहे. गेल्या वेळी अनेक शिवसैनिकांनी उमेदवार बदलण्यासाठी थेट उद्धव ठाकरे यांना चिठ्या दिल्या होत्या.त्या वरुन त्यांच्या विरुध्द स्व पक्षातील व आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाली नाही, ते कोणाला पाठिंबा देतात किंवा स्वतंत्र उमेदवार टाकतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा वेळी केवळ कार्यकर्त्यांच्या गराड्यात पळा पळ करुन किंवा आपले चार-दोन पदाधिकारी सांगतात म्हणुन उमेदवार देण्या ऐवजी खऱ्या अर्थाने थेट जनतेशी संवाद साधून सर्व सामान्य मतदारांची पसंती ओळखून उमेदवार दिला तरच खऱ्या अर्थानं तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवारा सोबत लढत होईल अशी अपेक्षा सर्व सामान्य मतदारांची आहे.

Box

काँग्रेस ला परत फेड करण्याची नामी संधी आली चालून

काँगेस नेत्या ॲड.जयश्री शेळकेंचे नावाची चर्चा जोरात सुरु असून त्या काँग्रेस पक्षाकडून बुलढाणा विधानसभेची तयारी करत आहे आणि ती पूर्ण ही झाली आहे, बुलढाणा विधानसभा मतदार संघ पिंजून काढला असला तरीही त्यांचें कार्यक्रम जिल्हाभर सुरु होते, बचतगट, कृषी कंपनी च्या माध्यमातुन त्यांचा बराच जनसंपर्क आहे, आणि गेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जसे ऐनवेळी जागा काँग्रेस ला सुटली होती आणि आमदार धिरजभाऊ लींगाडे यांना लॉटरी लागली होती.ते मोठ्या फरकाने विजयी झाले होते त्याच धरतीवर जर काँग्रेस नेत्या ॲड जयश्रीताई शेळके यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिल्यास, त्यांना त्यांच्या जनसंपर्काच्या आधारावर इतर पक्षाकडून प्रचंड प्रतिसाद मिळू शकतो त्या तुल्यबळ लढत देतील व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून एक सक्षम महिला खासदार संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा होईल आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून गड कायम राहील अशी मागणी सर्व सामान्य मतदारांकडून होत आहे

बुलडाणा जिल्हा रिपोर्टर
पुरुषोत्तम बोर्डे बुलढाणा

Leave a Comment