जि.प.उच्च प्राथमिक शाळा मेंदिपूर येथे “तान्हा पोळा साजरा

तिरोडा – सोमवार ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंदीपुर येथे सहशालेय उपक्रमांतर्गत ‘तान्हा पोळा’ साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात नंदी सजावट, वेशभूषा स्पर्धा, शेतकरी नृत्य, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला श्री धर्मराज चौधरी सरपंच मेंदीपुर, सचिंद्र पटले शालेय। व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री ठाकरे अध्यक्ष तंटामुक्त समिती तसेच इतर पालक उपस्थित होते. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून पेन व चॉकलेट वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे आयोजन श्री जितेंद्र डहाटे मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वाखाली श्री ए के भगत, आनंद भगत, महेंद्र रहांगडाले व सौ प्रीती पटले या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले.

प्रवीण शेंडे प्रतिनिधी गोंदिया

Leave a Comment