राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा नेते रविकांत खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जन आशिर्वाद यात्रा निघालेली आहे. ही यात्रा दिनांक ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी तिरोडा तालुक्यातील मौजा खमारी व डोंगरगाव पोहचली असता येथील नागरिकांनी यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व समर्थन दिले.
या परिवर्तन जन आशिर्वाद यात्रेचे औचित्य साधुन माजी सरपंच सौ सविता ताई पटले व उपसरपंच शुभम भैसारे यांनी युवा नेते श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वावर व कार्यावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला. यावेळी रविकांत बोपचे यांनी माजी सरपंच व उपसरपंच यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला व भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.