बीड जिल्ह्यातील गेवराई येथील धोंडीबा हातागळे यांना रतन टाटा युवा पुरस्कार 2024 जाहीर

परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही

बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणचे धोंडीबा हातागळे हे एका अल्पशात छोट्याशा गावातून येतात त्यांची ओळख मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून निर्माण केलेले आहे ते मानवी हक्क अभियानाचे गेवराई तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत ते गेले अनेक वर्ष कष्टकरी शेतमजूर ऊसतोड यांच्यासाठी विविध मागण्यांसाठी झगडत असतात त्यांनी अनेक वेळा आपल्या माध्यमातून मोर्चे आंदोलने केलेली आहेत याचे दखल घेऊन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 27 ऑक्टोबर रोजी इको फ्रेंडली लाइफ तरुण तगडा भारत आयोजित रतन टाटा युवा परिवर्तन 2024 हा वितरण सोहळा होणार आहे हा वितरण सोहळा धोंडीबा हातागळे यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे हा पुरस्कार सामाजिक राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना दिला जातो।

Leave a Comment