बंजारा समाजाच्या मेळाव्यास अर्ध्या खुर्च्या रिकाम्या

परमेश्वर चांदणे माजलगाव प्रतिनिधी

भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले गट कवाडे गट बंजारा पॅथर लहुजी विद्रोही सेना आझाद क्रांती सेना अमूल भैया शेरकर युवा मंच अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ बंजारा समाज मेळावा आज जुना मोंढा या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्यास वरील सर्व पक्ष संघटना व बंजारा समाजाचा या माजलगाव मतदार संघामध्ये मोठा वर्ग असून या मेळाव्यास बंजारा समाजाने पोट फिरवल्यासारखे चित्र माजलगाव शहरांमध्ये पहावयास मिळाले या मेळाव्यामध्ये अर्ध्याच्या वर रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या माजलगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार हे खटारा गाडी सारखे झाल्यासारखे आहे त्यामुळे या मतदारसंघातील खटारा गाडीत बसण्यास मतदार तयार नाहीत ही गाडी आता मूर्ती झाली आहे हिला घरी बसवल्या शिवाय पर्याय नाही असं नागरिकांमधून बोललं जातंय खास करून या मेळाव्यास जितेंद्र महाराजांची विशेष उपस्थिती होती तसेच या मेळाव्यास भाऊ कदम सीने अभिनेता याची देखील उपस्थिती असल्याने देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मतदार किंवा नागरिक या मेळाव्यास जास्त प्रमाणात दिसून आले नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच प्रकाश सोळंके यांना जनता घरी बसवल्यास शिवाय राहणार नाही असे चित्र यावेळी माजलगाव शहरांमध्ये आपणास मिळालेला आहे पुढे बोलताना प्रकाश सोळंके यांनी विरोधकावर टीका न करता मी व माझ्या वडिलांनी केलेला कामाचा पाढा वाचून दाखवला।

Leave a Comment