राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच महिलांना 3 हजार देणार व शेतकर्यांचे ३ लाखापर्यंतच कर्ज माफ करणार- शरदचंद्र पवार

तिरोडा, दि.०७ः- राष्ट्रवादी काँँग्रेस (श.प.) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तिरोडा येथील विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँँग्रेस (श.प.) महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत खुशाल बोपचे यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहून गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, गेल्या ६ महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आपण विवेकाचा वापर करुन केलेल्या मतदानामुळे राष्ट्रहितासोबत संविधानाची रक्षा करण्यात आली. आता विधानसभेच्या निवडणूकीच्या काळात दिल्लीतील सरकार हे सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करणारे नाही. आम्ही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करीत सर्वसामान्य जनतेकरीता एकत्र आलो. आता निवडणूकीतही आम्ही राज्याला विकासाचा प्रवाहात पुढे आणण्याकरीता व राज्यातील दूषीत झालेले वातावरण दूर करण्याकरीता एकत्र आलो आहोत. प्रत्येक विभागात वेगवेगळी पिके घेतली जातात. परंतू दिल्लीतील सरकार उत्पादन खर्चाचा विचार करीत नसल्याने लावलेल्या पिकाला विक्रीच्या वेळी योग्य मोबदला मिळत नाही. शेतकर्याला न्याय देणारा, कामगारांना काम देणारे सरकार तुम्हा आम्हाला सर्वांना राज्यात आणायचे आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील जनतेला एक गॅरंटी व विश्वास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ५ गोष्टींचा समावेश आम्ही केला आहे. त्यात महालक्ष्मी योजनेत महिलांना ३ हजार रुपये महिंना, महिला व मुलींना मोफत शिक्षण, शेतकर्याना ३ लाखापर्यंतचे कर्ज माफ व नियमित कर्ज फेडणार्याला ५० हजाराची मदतीसोबतच जातनिहायजनगणनेसोबत आरक्षणाची ५० टक्य्याची मर्यादा हटवण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीने घेतल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.ते तिरोडा येथील शहिद मिश्रा विद्यालयाच्या पटागंणावर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रविकांत खुशाल बोपचे यांच्या जाहिर प्रचार सभेत आज(दि.०७)बोलत होते. या प्रचारसभेच्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे(श.प.)अध्यक्ष शरदचंद्र पवार, जेष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार डाॅ.प्रशांत पडोळे, खासदार नामदेवराव किरसान, माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, बिरसा ब्रिगेड अध्यक्ष सतीश पेंदाम, तिरोडाचे उमेदवार रविकांत खुशाल बोपचे(गुड्डू), माजी आमदार व मोर/अर्जुनी उमेदवार दिलीप बंसोड, गोंदियाचे माजी आमदार व उमेदवार गोपालदास अग्रवाल, तुमसरचे उमेदवार चरण वाघमारे, ओबीसी प्रदेश अध्यक्ष राजा राजपुरकर, प्रदेश काँग्रेस सचिव पी.जी.कटरे, माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष पकंज यादव, माजी आमदार प्रकाश गजभिये, निरीक्षक बजरंग परिहार, माजी आमदार जनबा मस्के, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राधेलाल पटले, तिरोडा तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश टेंभरे, गोरेगाव तालुका अध्यक्ष जगदिश येरोला, गोंदिया तालुका ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष रमेश अंबुले,जिल्हा महिलाकाँग्रेस अध्यक्ष वंदना काळे, एड.टि.बी.कटरे, तिरोडा बाजार समितीचे संचालक ओम पटले, मदन पटले, पवन मोरे, रिपाईचे राजकुमार भेलावे, भाकपचे हौसलाल रंहागडाले, संगीता भगत, माया शेंडे, रश्मीताई गौर, रुबीना मोतीवाल, भाग्यश्री केळवतकर, टीना उपवशीं, चंदा शर्मा, मेघा बिसेन, राघवेंद्र बैस, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, हेमराज अंबुले, प्रकाश बघेले, रविंद्र वंजारी, यांच्यासह काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा रिपाई घटक पक्षाचे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राजेश सरकटे यांनी शरद पवार यांच्यावर तयार करण्यात आलेले गीत सादर केले.

राज्यात विकासाकरीता आपण सर्वांना काम करायाचे असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्व परीने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते १०० टक्के सोबत असतील अशी ग्वाही देत तिरोडा मतदारसंघातून रविकांत बोपचे, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून आपण स्वतःदिलीप बनसोड,गोंंदियातून गोपालदास अग्रवाल व आमगाव मतदारसंघातून राजकुमार पुराम,तुमसरमधून चरण वाघमारे या महाविकास आघाडीच्या उमेदवारांकरीता एकदिलाने आपण विजयाचा शिक्का येत्या २० नोव्हेंबरला उमटवण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बनसोड यांनी मतदारांना केले.

यावेळी बोलतांना तिरोडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविकांत बोपचे यांनी आपण गेल्या निवडणूकीत आपला पराभव झाला,तेव्हापासून आपण कुठलीही चिंता न करता मतदारांच्या सेवेत आजपर्यंत कार्यरत आहे.आमचा मतदारसंघ आदिवासी बहुलअसल्याने त्यांच्या समस्यां सोडवण्याचे काम आपली महाविकास आघाडीच्या माध्यमातून करता येईल.सोबतच नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्पाचा प्रचार प्रसार करुन व नव्या योजना युवकांकरीता रोजगाराच्या आणून रोजगार देण्याची आपली योजना असल्याचे सांगत जिल्हा परिषद शाळांचे वर्ग सध्या सरकार बंद करीत आहे,त्या शाळा व वर्ग बंद न करता खासगी शाळेसारखे शिक्षण देण्याकरीता आपल्याला काम करायचे आहेत.आरोग्य विभागाचा डोलारा कोळमळलेला असल्याचे सांगत येते आरोग्य केंद्र व रुग्णालयात अनेक साहित्य नसल्याने रुग्णांना सोय नसल्याने त्रास सहन करावे लागत आहे,त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण निवडून आल्यानंतर करणार असल्याची ग्वाही दिली.आपल्या आमदारकीचा पूर्ण पगार गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणावर व आरोग्यावर खर्च करणार असल्याची घोषणा केली.सोबतच नावाजलेल्या जागृती पतसंस्थेचा सामान्य जनतेचा पैसा सर्वसामान्याना मिळालेला नाही,त्यामुळे आपली सरकार सत्तेत येताच आपण आम्हाला यांचा पैसा परत करण्याकरीता सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.यावेळी बोलतांना

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी राज्यातील महायुती सरकारला खाली खेचण्याची वेळ आली महिलामुलासंह आमच्या दैवतांचा अपमान करणार्या राज्यसरकार उखडून फेकत राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे यांनी देशातील ७० हजारकोटी रुपयांची शेतकर्याना कर्जमाफी देणारे व पुरोगामीत्व जपणारे शरद पवार साहेब असून त्यांनी पुरोगामीत्वाची कास टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.धानाची लागवड गोंंदिया भंडारा जिल्ह्यात अधिक होते परंतु लागवडीचा अधिक खर्च असल्याने आपली सरकार येताच धानाला भाव वाढवून द्यावे लागेल.राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब गुजरातला जात असलेल्या उद्योगावर ते राज्य पाकिस्तांनात आहे का असे बोलून टाळतात.

भंडारा-गोंदियाचे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार साहेब हे राजकारणातील चाणक्य असल्याचे सांगत विरोधकांचे मनसुबे उधळून लावतात.पुर्व विदर्भातील पुर्ण सिंचन प्रकल्प झाल्याने पुर्व विदर्भ सिंचनात अग्रसर राहिले.शेतकरी,कामगारांना न्याय द्यायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन राज्यातील शेतकरी,ओबीसी विरोधी नरकारुपी सरकारला हाकलून लावण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे म्हणाले की महाराष्ट्रातील हे तिघाडी सरकार हे गुजरातकरीता काम करणारे असून नागपूरातील वेदांतासारखे प्रकल्प गुजरातल्या नेल्याने विदर्भातील सुशिक्षित युवकांना रोजगारापासून वंचित केले आहे.छत्रपतींच्या पुतळ्यातही भष्ट्राचार करणारे हे राज्यातले सरकार हाकलून लावायचे आहे.बहिणीच्या विरोधात बायकोला निवडणूकीत उभे करणारे लाडकी बहिण योजना सुरु करते यावरुन लाडक्या बहिणोंनो समजा असे म्हणाले.यावेळी तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवीण शेंडे ब्युरो चीफ गोंदिया

Leave a Comment