तब्बल १७ वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र; बोरखेडे बु. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
चाळीसगाव (संदीप पाटील): शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत दि.४ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बु.पिराचे येथील माध्यमिक विद्यालयाच्या २००७ च्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. बोरखेडा जवळील ऋषीपांथा येथील निसर्गरम्य परिसरात हा मेळावा संपन्न झाला. प्राथमिक शाळा ते माध्यमिक विद्यालयात २००७ पर्यंतचे माजी विद्यार्थी जवळपास १७ वर्षांनंतर प्रथमच एकत्र या मेळाव्यात सहभागी झाले होते. या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री. भवर सर श्री. ठाकुर सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री शिक्षकवर्ग श्री.बागुल सर,श्री.महाजन सर, श्री. शालिग्राम पाटील सर, सौ. रेखा पाटील मॅडम, श्री. विजय चौधरी सर, श्री. सोनवणे सर,श्री. गवळी सर श्री. बी.जे.पाटील सर श्री. रमेश सोनवणे सर, श्री.पवार सर हे सर्व एव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच श्री.रायबा आबा व श्री.सुनिल तात्या यांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी ॲड. सौ. करुणा सोनवण यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व डॉ. दिनेश सोनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ. शितल पाटील, सौ. पूनम पाटील, सौ.विद्या पाटील यांनी मान्यवरांसाठी स्वागतगीत सादर केले. यावेळी सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व विठ्ठल रुक्मिणी ची मुर्ती भेट देउन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी घडवलेले सर्व विद्यार्थी आज समाजातील सर्व क्षेत्रांत सर्वोत्तम कामगिरी करुन नावलौकिक मिळवत आहेत त्यांच्या नावलौकिकासोबत शाळेचे व शिक्षकांचे नावही गौरवान्वित करत आहेत याबद्दल समाधान व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी विद्यार्थी, डॉ.दिनेश प्र. सोनार, भाऊसाहेब प. पाटील, सचिन भो. पाटील, संदीप ध. पाटील, सचिन प्र. पाटील, सागर भ. भालेराव, अमोल दे. पाटील, राहुल भा. पाटील, महेश पाटील, भुपेंद्र दे.पाटील, नानासाहेब व. पाटील, भाऊसाहेब सु. पाटील, समाधान उ. पाटील, तुळशिराम चित्ते, विनोद पाटील, दिपक वि. पाटील, राहुल भा.पाटील, अत्तर शेख, मनोज र. पाटील, ज्ञानेश्वर र. पाटील, राकेश शां. पाटील, कासम शेख, मनोज रा. पाटील, ज्ञानेश्वर आ. पाटील, बशीर शेख, रावसाहेब ल. पाटील, शरद पिलोरे, ॲड.करुणा सोनवणे, शितल पाटील, पूनम पाटील,विद्या पाटील, जयश्री पाटील, कविता पाटील, राजश्री पाटील, दिपाली पाटील, महानंदा पाटील,इंदीरा पाटील इ. सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.