“तुम वोट दो, बडा हम बनायेंगे मंगेशदादा को” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
चाळीसगाव येथे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाणांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अभुतपुर्व सभा संपन्न
चाळीसगाव (संदीप पाटील): तुम वोट दो बडा हम बनायेंगे मंगेशदादा को असे आश्वासक वचन देत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रचारासाठी आज देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची अतिशय प्रचंड सभा चाळीसगाव येथे पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावेळी उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करत भविष्यात मोठी जबाबदारी टाकणार असल्याचे सुतोवाच केले आहे. दरम्यान शहा यांच्या आधि मनोगत व्यक्त करताना ग्रामविकासमंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी देखील जनतेला आवाहन केले की तुम्ही मंगेशदादाला निवडून द्या आम्ही मोठं करु असं विधान केल्याने भविष्यात आपल्या चाळीसगाव तालुक्याला आमदार मंगेशदादा यांच्या रुपाने नेमकं कोणतं मोठं पद भेटणार आहे याबाबत उपस्थित नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत होती.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी पाटणादेवी चंडीकादेवी,थोर गणितज्ञ भास्कराचार्य आणि जगप्रसिद्ध चित्रकार केकी मुस यांचं नाव घेऊन समस्त चाळीसगाव तालुक्यातील जनतेचं मन जिंकून घेतले.या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची सत्ता पुन्हा स्थापन होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य नेहमीच देशात एक नंबर प्रगतीपथावर राहणार आहे असं देखील यावेळी अमित शहा यांनी सांगितले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी इतके कामं केल्याचं दिसून येत आहे की जर ते माझ्या मतदारसंघात निवडणूक लढवतील तर माझा देखील पराभव होईल असे देखील कौतुक अमित शहा यांनी केल. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खा.स्मिताताई वाघ, आ.किशोर पाटील,माजी आमदार साहेबराव घोडेसर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, पारोळा येथील महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
”आपण सगळे मंगेशदादाला निवडून द्या, मोठं करायची जबाबदारी आमची”- गिरीश महाजन
आम्ही याअगोदर देखील एकाला असाच जीव लावला होता आणि आमदार, खासदार केला पक्षाने पण तो बेईमान निघाला असून गेल्या दहा वर्षांत त्यांने कोणतेच कामं केलें नाही म्हणून आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकिट नाकारले अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. आपले उमेदवार आणि आमदार मंगेशदादा चव्हाण हे जनतेत राहणारे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी व जनतेच्या भल्यासाठी भांडून निधी खेचून आणणारे आमदार असून सगळ्यात जास्त विकासनिधी जर जर कोणत्या आमदाराने आपल्या मतदारसंघात आणला असेल तर ते म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाण आहेत आणि म्हणून यावेळी पुन्हा तुम्ही मंगेश दादांना निवडून द्या त्यांना अजून मोठं करायची जबाबदारी आमची आहे असं म्हणत ना.महाजन यांनी मंगेश चव्हाण यांच्या विषयी भविष्यवाणी केली आहे.