अवैध क्लबच्या जाळ्यात माजलगावातील तरुण पिढी बरबाद मात्र पोलिसांचे दुर्लक्ष
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही
माजलगाव तालुक्यामध्ये दारू मटका व पत्ते यांच्या क्लब मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे या सर्व तरुण पिढी नोकरदार वर्ग बरबाद होताना दिसत आहे
यामध्ये देखील या विळख्यात अडकलेले आहेत कधी कधी शाळेला सुट्टी देऊन कधी पत्त्याचा क्लब वर तर कधी दारू पिण्यासाठी धाब्यावर सरसपणे नोकरदार दिसून येताना दिसत आहेत
अशातच गरीब वर्ग देखील याला अपवाद ठरलेला नाही एकदा ऊसतोड कामगार उचल घेऊन पत्त्याच्या क्लब वर खेळून त्या पैशाची उधळपट्टी करतात आणि आपले लेकरं मूळ मुले बाळ घेऊन ऊस तोडणीसाठी सहा महिने गावाबाहेर पडतात परंतु हा पैसा या ठिकाणी आपला गेला आहे अशा नैराश्यातून काही मजूर यामुळे त्या परिवाराचे संसार उध्वस्त होताना दिसत आहेत तरी अशा क्लब वर मात्र पोलीस कुठलेही कारवाई करताना दिसून येत नाहीत कोणीतरी चिरीमिरी च्या नावाखाली खुले
पत्त्याचे क्लब माजलगाव शहरांमध्ये चालू आहेत या सर्वांना आळा बसावा म्हणून काही नागरिकांना गावातील क्लब वर येणाऱ्या लोकांकडून नाहक त्रास होत आहे अहो रात्र हा खेळ चालू असतो खेळ खेळायचा एकीकडे गाडी लावायची एकीकडे कोणाच्याही घरासमोर गाडी आडवी लावून कशाही प्रकारे सोडून देतात अहोरात्र दारू पिऊन येऊन मोठ्या आवाजाने शिवीगाळ करणे ओरडणे असे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत परंतु त्या व्यक्तीचा विचारला तर आपल्याला आपल्याशी भांडण करेल या भीतीने कोणीही त्यांना काही म्हणत नाही परंतु अशा क्लब वर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे
माजलगाव शहराजवळ कोर्टाच्या बाजूला नागझरी या गावांमध्ये असाच एक गेल्या अनेक वर्षापासून लाखोंची उलाढाल या ठिकाणी या क्लबच्या नावावर होत आहे परंतु याकडे पोलिसांचे डोळे झाक पणे आशीर्वाद असल्यासारखे दिसून येत आहेत कुठल्याही व्यक्तीने या क्लब विषयी फोन लावून माहिती दिली असता कसलेही प्रकारचे त्या फोन वाल्याला दात दिली जात नाही आणि त्या क्लब बोलायलाच फोन लावून सांगतात वरील पथक येत आहे असे प्रकार माजलगाव शहरामध्ये घडत आहेत तरी हा क्लब लवकरात लवकर बंद करावा त्या गावातील नागरिकाकडून होत आहे येणारी पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही या पिढीला वाचवायचे असेल तर अशा क्लब वर दहा टाकून कारवाई करण्यात यावी असे मागणी नागरिकांकडून केली जात आहे
आम्ही जर रीतसर अर्ज दाखल केला तर अशा धमक्या देऊन माझ्या मागे तुम्हाला मी बघून घेईन अशाप्रकारे धमकी देऊन हा क्लब अनेक वर्षापासून चालू आहे तरी येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी आमच्याकडे केली आहे