वॉकथान स्पर्धेत अरविंद उके प्रथम
तिरोडा -दिनांक 2 जानेवारी 2025 ला पोलीस वर्धापन दिन निमित्ताने तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत वॉकथान व मिनी मॅरेथॉन 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
आपले सुदृढ आरोग्य , पर्यावरण शांतता व राष्ट्रीय एकात्मते करिता सहभागी होण्याची आव्हान तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आले होते .तिरोडा तालुक्यातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
सकाळी 6:30 वाजता पोलीस निरीक्षक श्री अमित वानखडे यांनी हिरवी झेंडी दाखवून दोन्ही स्पर्धेला सुरुवात केली.
तीन किलोमीटर वॉकथान मध्ये श्री अरविंद उके पदवीधर शिक्षक मुंडीपार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
त्यांना प्रमाणप्रत्र व भेटस्तू देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रम पोलीस स्टेशन तिरोडा ह्या ठिकाणी घेण्यात आला याप्रसंगी डी वाय एस पी श्री साहिल झरकर साहेब ,तिरोडा पोलीस निरीक्षक श्री अमित वानखडे,……… तहसीलदार तिरोडा,श्री ललित परिहार नगरपरिषदेचे सीईओ व तिरोड्यातील ह्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी सहकार्य केलेले सर्व असोसिएशनचे मेंबर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अविनाश जयस्वाल यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .सहभागी स्पर्धांना चहा नास्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ गोंदिया