संविधान अमृत महोत्सव निमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी, संविधान मैत्री संघ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली महापुरुषांचा, महानायिकांचा कोणताही जात वा धर्म नसतो; त्यांचे कार्य व विचार मानवतेसाठी प्रेरक असतात. सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी सुशिक्षित होणे, सर्व समुदायांना संघटीत करून एकसूत्रात बांधणे आणि योग्य वेळी संघर्ष करणे आवश्यक आहे. हाच सर्व महापुरुषांचा संदेश आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे यांनी वेगवेगळ्या समुदायात जन्म घेतला; परंतु विपरीत परिस्थितीमध्ये महिला, समाज व राष्ट्राच्या उत्थानासाठी सोबतीने श्रृंखलाबद्ध कार्य केले. समता, बंधुता या तत्वांसाठी पुढाकार घेऊन महिलांना शिक्षित करण्यासाठी धाडसी श्रम घेतले आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली. आपण वेगवेगळ्या जाती, धर्म समुदायातून असलो तरी आपण त्यांचा आदर्श घेऊन संघटीत होवून कार्य करावे लागेल. संविधानिक दृष्टीकोण बाळगून स्वतःचा व राष्ट्राचा विकास साध्य करावा लागेल. देशात सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय; विचार, विश्वास, स्वातंत्र्य व संधीची समानता पेरावे लागेल. सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक भेदभाव दूर करावा लागेल, तेव्हाच सशक्त राष्ट्राची निर्मिती शक्य होऊ शकेल. हाच महिला सक्षमीकरणाचा उद्देश्य आहे. याच विषयाला घेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
शनिवार, दिनांक 11 जानेवारी 2025 ला वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. शाळेचे प्रांगण, इथे महाप्रज्ञा बुद्ध विहारासमोर, निमटोली, तिरोडा याठिकाणी जयंती उद्घाटन सोहळा, प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन, महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीच्या नवीन पदाधिकारी यांचा स्वागत-सत्कार करण्यात आला. तसेच संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा 2024 प्रमाणपत्र व पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. प्रा. दिशा गेडाम (जिल्हा संयोजीका – संविधान मैत्री संघ), उद्घाटक: मा. दिव्या बरड (API) पो.स्टे. तिरोडा,सहउद्घाटक: मा.कु. आर. के. कडव अधिक्षक दिवाणी न्यायालय, तिरोडा,
मा. ओमकांता रंगारी तालुका क्रीडा अधिकारी, गोंदिया, मा. सौ. रजनी मोरे सामाजिक कार्यकर्त्या,मुख्य मार्गदर्शक : मा. सरयुताई डहाट (बामसेफा)यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
विशेष अतिथी : प्रा. अश्विनी भावे, संविधान मित्र संघ, गोंदिया मा. नयना माहुर्ले मॅडम पोलीस विभाग, तिरोडा मा. नम्रता गोस्वामी, मा. शुभांगी चौधरी, मा. आफरीन खान, डॉ. प्रज्ञाशी डोंगरे, मा. अड. किरण लांजेवार, अॅड. सुप्रिया वासनिक, मा. मायाताई बन्सोड उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन संविधान मैत्री संघाचे संयोजक आयु. अनमोल चव्हाण व प्रीती रामटेके यांनी केले. आभार प्रदर्शन ऐड शेंडे यांनी केले।
प्रवीण शेंडे ब्युरो चीफ गोंदिया