सुर्तिसेन वैद्य जयंतीनिमित्त उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

सुर्तिसेन वैद्य जयंतीनिमित्त उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

गोंदिया

डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व महाराष्ट्र पुरोगामी सेवानिवृत्ती शिक्षक कर्मचारी संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष सुर्तिसेन वैद्य गुरुजी यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आमदार विनोद अग्रवाल आणि घनश्याम पानतावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल यांचा वैद्य परिवाराकडून शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

बौध्द सामुहिक विवाह समितीचे अध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती घनश्याम पानतावणे यांचा उत्कृष्ट सामुहिक विवाह आयोजनकरिता सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच समाज सेवक रुपेश नशिने, दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेले मिलींद बांम्बोळे, भिमघाट स्मारक समिती चे अध्यक्ष श्यामभाऊ चौरे, राज्य स्तरीय बैडमिटन खेळाडू मुनाफ अखिल कुरैशी यांना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ओल्ड गोंदिया परिसरातील गुणवंत विद्यार्थी कु. संचिका प्रफुल्ल बनसोड, कु. पुर्विका मदन टोले, कु. रिधीमा प्रकाश वैद्य, कु. रिदीमा रुपेश रामटेके, कु. सुहानी अरविंद चव्हाण, कु. मानशी महेश भावे, आदीत्यकुमार बागडे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमापासून करण्यात आली, आमदार विनोद अग्रवाल यांच्या सह उपस्थित घनश्याम पानतावणे, भावना ताई कदम, रुपेश नशिने, चंन्द्रभान तरोणे, सुशिल ठवरे, नादीराताई महंती, संजय वैद्य, मनंजय वैद्य, मिलींद बांम्बोळे, मयुर गजभिये, योगेश राऊत, अखिल कुरैशी, खेमेंद्र वासनिक आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी सुर्तिसेन वैद्य गुरुजी यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंकुश वैद्य, गौतम गणवीर, महेश ठवरे, प्रकाश वैद्य, क्षितीज वैद्य यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम भाऊ चौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय वैद्य यांनी केले.

 

प्रवीण शेंडे

ब्युरो चीफ

गोंदिया

Leave a Comment