प्रयागराज येथे कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना नागपूर पासून पुढे दीडशे किलोमिटर अंतरावर सिवनी येथे स्थानिक पोलिस प्रशासनाने रोखले आहे. प्रयागराज मध्ये पवित्र स्नान करण्यासाठी सध्या लाखो भाविक दाखल झाल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले असून येथील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयागराजकडे जाणारी वाहतूक कटनी येथे रोखण्यात आली आहे.काल शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून म्हणजेच जवळपास ३४ तासापेक्षा अधिक वेळ भक्त अडकून पडले आहेत.विशेष म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी पौर्णिमा असल्याने प्रयागराज येथे शाही स्नान करण्यासाठी कुणी नियोजन करत असतील तर कृपया त्यांनी सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घ्यावा.वाढलेली प्रचंड गर्दी, मध्या प्रदेश व उत्तर प्रदश सरकारने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी प्रयागराजच्या दिशेने जाणारी भाविक भक्तांची शेकडो वाहन थांबवली जात आहे. त्यामुळे भाविक भक्तांमधून नाराजी व्यक्त केल्या जात आल्याचे दिसून आले आहे.*
न्यूज इंडिया टीव्ही आय टी एम रिपोर्टर वाशिम