
सर्वाधिक 25% हुन अधिक काम पुर्ण
शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी व शेतीस अधारित माहिती एकत्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत माहिती घेऊन,शेतकऱ्यांना त्यांचे शेतकरी कार्ड काढून शासनास सहकार्य करण्यास सांगण्यात आले.कराड तालुक्यातील जास्ती जास्त सुशिक्षित शेतकरीवर्ग असल्यामुळेच महाराष्ट्रात कराड तालुक्यातून 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांपैकी 56 हजार 240 शेतकऱ्यांनी आपले शेतकरी आडीकार्ड काढले आहेत.
//आता पाहुया योजनेचे संभाव्य फायदे// 1)पीएम किसान योजनेंतर्गत अनुदानासाठी आवश्यक अटी पुर्ण करुन तो लाभ देण्यास सोईस्कर होईल. 2)पीककर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडात सुलभता येईल. 3)पीक विम्यासह आपत्कालीन नुकसान भरपाई सर्वेक्षण करण्यास मदत होईल. 4)किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये नोंदणीकरण ऑनलाईन होईल.
//सातारा सुहास पाटील//