सोमवार दिनांक 10 मार्च रोजी राञी 12 वाजण्याच्या सुमारास वाठार गावाच्या हद्दीतील गणेश पेट्रोल पंपावर दरोडा टाकून सव्वा लाखाची रोकड पळवून नेण्यात आली दुचाकीवरून दोन ईसम पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास आली. असता अचानक पेट्रोल देणारा
माणसावर कोयत्याने वार करून
सव्वा लाखाची रोकड लंपास करण्यात आली.जखमी ईसमाचे नाव परशुराम दुपटे असे आहे.त्याने
जखमी अवस्थेत पेट्रोल पंपाचे मालक रुशिकेश गावडे व मॅनेजर निलेश तावरे यांना घडलेला प्रकार सांगण्यात आले.त्यांनी लगेच पेट्रोल पंपावर धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन कराड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
// पोलीस स्टेशनला माहिती मिळताच तीन पोलीस पथके रवाना//
पेट्रोल पंपावर दरोडा पडलेल्या ठिकाणी पोलीसांनी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन पोलीस पथक विविध ठिकाणी
पाठवण्यात आली.