कराडला नविन एमआयडीसी व्हावी, आयटीपार्क होण्यासाठी
कराड दक्षिण मतदार संघातील उंडाळे गावचे सुपुत्र विश्वजीत पाटील उंडाळकर यांनी सहा वर्षांपासून शासनाकडे मागणी करत आहेत. परंतु त्यांची शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्यानी आपल्याच राहत्या घरी बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले. याची दखल घेऊन एमआयडीसीचे अधिकारी डाॅ.अमितकुमार सोनडागे व ई.अधिकारी यांनी तात्काळ उंडाळे गावातील उपोषण कर्ते विश्वजीत पाटील उंडाळकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उंडाळकर यांनी उपोषणाला स्थगित करण्यात आले.शासनाकडून नविन एमआयडीसी करण्यासाठी कोणतीच अडचण नाही.परंतु कमीत कमी 100 हेक्टर जमीन उपलब्ध पाहीजे. जागा उपलब्ध करून देण्यासाठी उंडाळकर यांनी मध्यस्थी करून जागा उपलब्ध करून शासनास सहकार्य करावे. असे सांगून उंडाळकर यांनी सरबत घेऊन उपोषण थांबवण्यात आले.