
माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केली रस्त्याची पाहणी करून त्वरित रस्ता दुरुस्तीचे दिले निर्देश*
धानोरा, मुंगनेर ते पेंढरी जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त असून याची दखल घेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी दिनांक 26 एप्रिल शनिवारी या रस्त्याची पाहणी केली. व या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली जिल्हा हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असुन दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळणळणाच्या सोयींची पूर्तता करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार जोमाने कार्य करत आहे त्यामुळे दुर्गम भागात काही रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यास त्याकडे विशेष लक्ष देवून या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देवून ती समस्या सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्याना सांगत लवकरात लवकर या खड्डेमय रस्त्याच्या त्रासापासून मुक्तता करावी असे निर्देश त्यांनी दिले.