
इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरी वाशिम
शिवसेना वाशिम तालुकाप्रमुख पदी परमहंस मुसळे यांची नियुक्ती
वाशिम जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी व कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नवनियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये परमहंस मुसळे यांची वाशिम तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी विद्यमान वाशिम तालुकाप्रमुख प्रकाशभाऊ महाले यांची पदोन्नती करत उपजिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. तसेच, विशाल सोमटकर यांची वाशिम शहरप्रमुखपदी, देवानंद बांगर यांची शिक्षक सेना उपजिल्हाप्रमुखपदी, मोहन कोल्हे यांची युवासेना वाशिम तालुकाप्रमुखपदी, तर आकाश कांबळे यांची शिवसेना अनुसूचित जाती सेल वाशिम शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडी प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजयभाऊ खानझोडे, जिल्हा संघटक अनिल गरकळ, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत कव्हर, नागेश घोपे, चौधरी सर, ज्येष्ठ शिवसैनिक अमृतराव गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या संघटनात्मक निर्णयामध्ये उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार आ. भावनाताई गवळी, जिल्हाप्रमुख महादेवजी ठाकरे व विजय खानझोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
शिवसेना पक्षाच्या भविष्यातील बळकटीसाठी ही नवी संघटना मोलाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.