शहर पोलीस स्टेशन वाशीम येथे
आजच्या झालेल्या शांतता समिती च्या मिटिंग मध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका असे पत्रकार परिषद घेऊन वाशिम जिल्ह्याचे , जिल्हा अधीक्षक मा, अनुज तारे यांनी सांगितले,
काल रात्री वाशिम शहरात किरकोळ वादातून झालेल्या दगड फेकी दरम्यान नागरिकांना संयम ठेवण्याचे व अफवावर विश्वास नं ठेवण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे सर यांच्या कडून करण्यात आले. तसेच समाजामध्ये व सोशल मीडियावर अफवा पसरर्वीणाऱ्यावर कडक कारवाई करणार असून असल्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन वाशिम शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्या कडून करण्यात आले आहे.
इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम