अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोडलवाही (P.H.C. Godalwahi) या केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. येथील आरोग्य सुविधा आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, विशेषतः या दुर्गम परिसरातील आव्हाने, जाणून घेतली. जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे, हेच आपल्या कामाचे उद्दिष्ट आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान, या भागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे निदर्शनास आले, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या पाहणी दौऱ्यात समोर आलेल्या समस्यांवर, विशेषतः अतिदुर्गम भागातील मलेरिया नियंत्रणासाठी, तातडीने लक्ष देऊन, त्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली जाईल. नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांना मलेरियासारख्या आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष. अनिलजी पोहनकर, भाजप धानोरा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, तसेच. सारंगजी साळवे, सुभाष धाईत सुभाषजी खोबरे. राकेशजी दास, गजाननजी परचाके आणि PHC च्या डॉ. पूजा परशुरामकर यांसह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते।